Advertisement

गणेशोत्सव २०१९: धोतर, उपरण्यातल्या बाप्पाला मागणी फार

यंदा घरगुती गणपती बाप्पांनाही धोतर आणि उपरण नेसवलं जात आहे.

SHARES

गणेशोत्सवाला अवघे २ दिवस शिल्लक राहिले आहेत. मुंबईसह राज्यभरात सर्व गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहे. सजावटीच्या सामानासोबतच मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. बाजारात गणपती बाप्पाची वेगवेगळ्या पेहरावातली रुपं पहायला मिळत आहेत. बाप्पाची ही रुपं सर्वांनाच आकर्षित करत आहेत. मात्र, यंदा घरगुती गणपती बाप्पाच्या पेहरावात एक नवी गोष्ट आली आहे, ती म्हणजे 'धोतर आणि उपरणं'.


भक्तांची मागणी

मागील अनेक वर्ष सार्वजनिक गणेश मूर्तींनाच धोतर आणि उपरणं नेसवण्यात येत होतं. मात्र, यंदा घरगुती गणपती बाप्पांनाही धोतर आणि उपरणं नेसवलं जात आहे. भक्तांची वाढणारी मागणी पाहता वेगवेगळ्या रंगाचं धोतर बाप्पाला नेसवलं जात आहे.

घरगुती कार्यशाळा

चिंचपोकळी येथील 'सुहासिनी आर्ट' या घरगुती गणेश मूर्तीच्या कार्यशाळेत मूर्तींना धोतर आणि उपरणं नेसवलं जात आहे. लाल, पिवळा, हिरवा आणि जांभळा यांसारख्या वेगवेगळ्या रंगाचं धोतर बाप्पांना नेसवलं जात आहे. यामध्ये जांभळ्या रंगाच्या धोतराला बाजारात गणेश भक्तांकडून अधिक पसंती मिळत असल्याचं सुवासिनी आर्ट्सचे हसमुख मकवाना यांनी सांगितलं. 'सुहासिनी आर्ट' या घरगुती गणेश मूर्तीच्या कार्यशाळेत दीड फूटांपासून ५ फुटांपर्यंत धोतर आणि उपरणं नेसवलेल्या मूर्ती आहेत. तसंच, या मुर्तींना फेटेही बांधले जात आहेत.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: भारत-पाकचा राजा, मुंबईतून झाला रवाना

गणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा