Advertisement

लालबागच्या राजाच्या चरणी 'इतकं' सोनं जमा!

'नवसाला पावणारा' राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणं यंदाही गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात सोनं चढवलं आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी 'इतकं' सोनं जमा!
SHARES

'नवसाला पावणारा' राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणं यंदाही गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात सोनं चढवलं आहे. सोमवारी लालबागच्या राजाची दानपेटी मोजण्यात आली. त्यावेळी या दानपेटीत जवळपास कोटी रुपये भाविकांनी दान केले होते. त्याशिवाय जवळपास ८० किलो चांदी आणि ४ किलो सोनं भाविकांनी दान केलं होतं. 

६ कोटींपेक्षा अधिक

लालबागच्या राजाच्या दानपेटीतील मोजलेली रक्कम आतापर्यंत ६ कोटींपेक्षा अधिक आहे. मात्र, आणखी काही दानपेटी मोजायच्या बाकी आहेत. त्यामुळं या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच, सोनं आणि चांदीचा लिलावाला देखील सोमवारी सुरूवात झाली असून पुढील २ दिवस हा लिलाव सुरू राहणार आहे.  

१२ कोटी रुपये 

दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान जमा होतं. मुंबईसह राज्यभरातील लाखो गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मागील वर्षी लालबागच्या राजाच्या दानपेटीत १२ कोटी रुपये जमा झाले होते. 



हेही वाचा -

विविध बॅंकांमधील मुदत ठेवी मोडून महापालिकेची बेस्टला मदत

सायन रुग्णालय पुनर्विकासाच्या प्रस्तावात तांत्रिक उणिवा, स्थायी समितीचा दावा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा