अक्षय्य तृतीया साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त

 Mumbai
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला इतर सणांएवढं महत्व आहे. या दिवशी सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होते. सर्वच आर्थिक स्तरांतील व्यक्ती थोडं का होईना, पण मुहूर्ताला सोनं खरेदी करतात. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूमध्ये निरंतर वृद्धी होते असं मानलं जातं.  म्हणूनच लोक सोने खरेदी करतात.

अक्षय्य तृतीया उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) राहते. आजच्या दिवशी भगवान विष्णूची पूजाही केली जाते आणि ती अक्षय्यी फलदायिनी असते, असेही सांगतात.

Loading Comments