नववर्षासाठी इको फ्रेंडली गुढ्या बाजारात दाखल

 Mumbai
नववर्षासाठी इको फ्रेंडली गुढ्या बाजारात दाखल
नववर्षासाठी इको फ्रेंडली गुढ्या बाजारात दाखल
See all

परळ - पूर्व येथील भोईवाड्यातील बाजार पेठेत लाल, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगांच्या लहान, मोठ्या आकर्षित इको फ्रेंडली गुढ्या पाहायला मिळत आहेत. या गुढ्या उभारून नागरिक नववर्षाचं स्वागत करणार आहेत.

इमारतीमधील राहणाऱ्या लोकांना गुढी उभारण्यासाठी जागेची कमतरता भासते, म्हणूनच तयार गुढीला धातूचा तांब्या, रेशमी कापड, साखरेची गाठ बांधून दिली जात आहे. तर, घरी गुढी उभारायची झाल्यास त्यासाठी नवी साडी, गुढीसाठी बांबू, पूजेचे सामान यासाठी होणारा खर्च हा रेडिमेड गुढीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे लोकांना बाजारातील तयार गुढी घेणे परवडत असल्याने बाजारात इको फ्रेंडली गुढ्यांना वाढती मागणी आहे. तर लाल, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगांच्या गुढ्याची किंमत साधारण 60 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे.

इमारतीच्या खिडकीमधून गुढी उभारणे शक्य नसते, हे लक्षात घेऊन बाजारात छोट्या गुढ्या विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे परळ पूर्व येथील भोईवाडा बाजार पेठेतील गुढी विक्रेत्या रेणुका पवार यांनी सांगितले.

Loading Comments