स्वागत मराठी नववर्षाचे...

मुंबई - गुढीपाडवा... अर्थात मराठी नववर्षातील पहिला दिवस. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. या दिवसापासूनच नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. मंगल्याचे प्रतीक असलेली गुढी घरोघरी उभारली जाते. या नववर्षाचे स्वागत सारे जण विविध पद्धतीने करतात, मात्र गुढी ही प्रत्येकाच्या घरी उभारली जाते. गोड-धोडाची चंगळ असते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या दिवसापासून केली जाते. मराठी गुढीपाडव्याचेे स्वागत करण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईतील विविध ठिकाणी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या दहिसर,गिरगाव,डोंबिवली,वाळकेश्वर,दादर परिसरात भव्य दिव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले होते.

Loading Comments