'इथे' प्रत्येक घरात बनतात कंदील! पहा मुंबईतलं कुठलं आहे हे ठिकाण...


SHARE

मुंबईत वर्षभर विविध पक्षांची राजकीय बॅनरबाजी पहायला मिळते. वर्षभर सुरू असलेली ही बॅनरबाजी दिवाळीत कंदिलात बदलते. राजकीय बॅनर ऐवजी कुणाचा कंदील मोठा? अशी चुरस दादरसह संपूर्ण मुंबई शहरात पहायला मिळते. जसे बॅनर आणि कंदील यांना एक राजकीय इतिहास आहे, तसेच हे कंदील जिथे बनतात त्या कंदील गल्लीचा देखील एक वेगळा इतिहास आहे.


'या' वाडीत प्रत्येक घरात बनतात कंदील!

माहीमस्थित कादरी वाडी ही गल्ली राजकीय कंदीलांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या वाडीत प्रत्येक घरात कंदील बनवले जातात. विशेषत: वाडीतले 5 तरुण गेल्या 30 वर्षांपासून राजकीय कंदील बनवण्याचा वारसा जपताना दिसतात. जगजीत सिंग, सतीश कोरी, आशय वैद्य, संजय साळवी, राजेश चौरोसिया ही या तरुणांची नावं. आपली नोकरी सांभाळून मिळेल त्या वेळात आणि मिळेल तेवढ्या वेळात प्रत्येक दिवाळीत गेली 10 वर्षे हे 5 जण 100 ते 150 राजकीय कंदील घडवतात.दसऱ्यापासून हे कंदील घडवायला सुरुवात होते. प्रत्येक दिवाळीमध्ये किमान 100-150 मोठे राजकीय कंदील आणि हजारो छोटे मोठे सजावटीचे पारंपरिक कंदील या ठिकाणी तयार केले जातात. मोठ्या कंदीलची उंची 3 फूट ते 15 फूट अशी असून यांच्या किंमती 3000 पासून ते 18000 रुपये आहेत. छोट्या सजावटीच्या कंदीलाच्या किंमती 20 रुपयापासून ते 400 रुपयांच्या दरम्यान आहेत.


दरवर्षी सर्वच राजकीय पक्षांचे कंदील या ठिकाणी बनवण्यात येतात. शिवसेनेचे कंदील मात्र दरवर्षी याच याठिकाणी बनवण्यात येतात. या ठिकाणी बनवलेले कंदील बोरीवली ते चर्चगेट असे मुंबई शहरात, तर महाराष्ट्रामध्ये नागपूर, नाशिक, पेण या ठिकाणी पाठवले जातात.


या सोसायटीचे दरवर्षी असतात मोठे कंदील

शांती सोसायटी (दादर), वृंदावन सोसायटी (बांद्रा), रत्नदीप क्रीडा मंडळ (वांद्रे) यांचे कंदील गेले 30 वर्षे या वाडीत बनवण्यात येतात. राजकीय पक्षांप्रमाणे काही सोसायटीदेखील दरवर्षी कादरी वाडीतून कंदील बनवून घेतात.


आदित्य ठाकरे स्वत: यायचे कंदील घ्यायला...

इको फ्रेंडली पद्धतीने तयार केलेले छोटे 50 कंदील बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून मातोश्रीवर लावण्यासाठी घेऊन जात. पूर्वी आदित्य ठाकरे स्वत: यायचे. आता त्यांच्या घरातले इतर लोक येतात. राजकीय पक्षाचे कंदील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते घेऊन जातात. त्यातून कंदील राहिले तर माहीमच्या कंदील गल्लीत विक्रीसाठी ठेवले जातात.

सतीश कोरे, कारागीर


'कला शिकण्याची आवश्यकता पडली नाही, परंपरेने अवगत झाली'

गेली 10 वर्षे आमचे कंदील मातोश्रीवर लावले जातात. 20 ते 400 रुपये किंमतीचे छोटे कंदील आम्ही प्रत्येक जण बनवतो. मोठे कंदील मात्र आम्ही सर्व एकत्र येऊन तयार करतो. माझे वडील कंदील बनवायचे. त्यामुळे कला शिकण्याची आवश्यकता पडली नाही. परंपरेने अवगत झाली. यंदा 3 फुटांचे 20 कंदील साकीनाक्याचे आहेत आणि 15 महिमचे आहेत. मी नोकरी सांभाळून मिळालेल्या वेळेत कंदील बनवतो, असेही कोरे यावेळी म्हणाले.हेही वाचा - 

दिवाळी स्पेशल करायचीये? मग लोकरीचे कंदील लावा!


संबंधित विषय