Advertisement

... म्हणून १५ जानेवारीला साजरी होणार संक्रांत


... म्हणून १५ जानेवारीला साजरी होणार संक्रांत
SHARES

वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत... संक्रांतीला गोडा-धोडाचे पदार्थ, हळदी कुंकवाच्या निमित्तानं शेजाऱ्यांच्या भेटी, पतंगोत्सव अशा अनेक प्रकारे संक्रांत साजरी केली जाते. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत. आज आम्ही तुम्हाला या तीन दिवसांचे महत्त्व तर सांगणार आहोतच, पण याशिवाय १४ जानेवारीला येणारी मकर संक्रांत यावर्षी १५ जानेवारीला का आली या मागचं कारणही सांगणार आहोत.


संक्रांत १५ जानेवारीला का?

दरवर्षी संक्रांत १४ जानेवारीला साजरी केली जाते. पण यावर्षी संक्रांत १५ जानेवारीला आली आहे. याचं कारण म्हणजे सौर मंडळातील सूर्याच्या गतीत झालेला बदल. सौर मापनानुसार ३६५ दिवसांचे एक वर्ष समजले जाते. लिप वर्षात (फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा असतो) एक दिवस वाढतो. सूर्य ठराविक गतीत राहत असल्यानं संक्रांत मागे-पुढे होत असते.

भोगी : महाराष्ट्रात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो. पौष महिन्यात थंडि असते. याच कारणास्तव संक्रांतीत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावट्याचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी बनवली जाते. अशा भाजीला भोगीची भाजी असे म्हटले जाते.

संक्रांत : भारतात संक्रांत वेगवेगळ्या नावानं साजरी केली जाते. दक्षिणेत पोंगल तर उत्तरेत लोहारी, बिहू या नावानं संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया मृत्तिका घटाचे वाण देतात. एकमेकांना तिळगुळ वाटतात. नात्यामध्ये आलेली कटुता विसरून पुन्हा एकदा नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा हा दिवस.

मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो असा एक समज आहे. संक्रांतीचा सण हा आरोग्याशी निगडीत आहे. चांगलेचुंगले, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला असा संदेश या सणातर्फे दिला जातो.

किंक्रांत : किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला देवीनं मारलं होतं. या दिवशी कुठल्या नवीन कार्याची सुरुवात करायची नसते, असा समज आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा