कोकणी-मालवणी जत्रा

 Abhyudaya Nagar
कोकणी-मालवणी जत्रा
कोकणी-मालवणी जत्रा
कोकणी-मालवणी जत्रा
कोकणी-मालवणी जत्रा
कोकणी-मालवणी जत्रा
See all

काळाचौकी - अभ्युदयनगर येथील शहीद भगतसिंग मैदानात मनसे प्रभाग क्रमांक 205 च्या वतीनं भव्य कोकण-मालवणी जत्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. या जत्रौत्सवाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या जत्रेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी लोक कला,सुके आणि ओले मासे, तळलेले बांगडे, पापलेट, हलवा, कोळंबी, खेकड्यांचा रस्सा, कोंबडी वडे अशी अस्सल मालवणी मेजवानी ठेवण्यात आलीय. या जत्रौत्सवाला मराठी दिग्दर्शक, अभिनेता केदार शिंदे, उपाध्यक्ष नंदकुमार चिले, उप विभाग अध्यक्ष विलास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments