Advertisement

यंदा लालबागच्या राजा विराजमान होणार प्रभावळविना


यंदा लालबागच्या राजा विराजमान होणार प्रभावळविना
SHARES

'नवसाला पावणारा राजा' अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाला आतापर्यंत वेगवेगळ्या कलात्मक नक्षीकाम केलेल्या प्रभावळ पाहिल्या आहेत. मात्र, यंदा लालबागचा राजा प्रभावळविनाच विराजमान होणार आहे. 

सध्याच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळं होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीचा मानवी जीवनाला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे लाखो गणेशभक्तांना निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश यंदा लालबागचा राजा देणार आहे.


लालबागचा राजा प्रभावळविना

याआधी १९८७ मध्ये लालबागचा राजा प्रभावळविना खडकावर विराजमान झाला होता. त्यानंतर आता तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा राजा प्रभावळविना विराजमान होणार आहे. मात्र प्रभावळ नसली तरी विसर्जनावेळी प्रभावळ असणार आहे. त्यामुळे कधी एकदा लालबागच्या राजाला पाहतोय अशाप्रकारचा उत्साह सर्व गणेश भक्तांमध्ये दिसून येत आहे.

यंदा पर्यावरण रक्षण या विषयावर देखावा आम्ही करणार आहोत. तसंच पर्यावरण रक्षण हा विषय असल्यामुळे यंदा बाप्पा जंगलात बसलेला दाखवणार आहोत. गणपतीभोवती वर्षाव करणारा धबधबा, घनदाट जंगल, त्यामधून वाघ, सिंह, हरण यांसारखे पशूपक्षी दाखवणारा देखावा सादर करणार आहोत. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई लालबागच्या राजाच्या देखावा उभारणार आहेत.
- बाळासाहेब कांबळे, अध्यक्ष, लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ


८५ व्या वर्षात पदार्पण

लालबागच्या राजाचं मखर आणि देखावा म्हणजे मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. गणेशोत्सवात सलग १० दिवस हा देखावा बघण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. लालबागच्या राजा सार्वजनिक मंडळानं यंदा ८५ व्या वर्षात पदार्पण केलं असून १९ जूनला लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा संपन्न झाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा