Advertisement

ईद-ए-मिलादला जुलूस काढण्यास सशर्त परवानगी, 'या' आहेत अटी

सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांबाबत मुस्लिम समाजानं नाराजी व्यक्त केली आहे.

ईद-ए-मिलादला जुलूस काढण्यास सशर्त परवानगी, 'या' आहेत अटी
Representative image
SHARES

पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारनं केवळ २५ लोकांना परवानगी दिली आहे. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांबाबत मुस्लिम समाजानं नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात शाळा, महाविद्यालये आणि मॉल उघडले जातात, राजकीय पक्ष मोठे कार्यक्रम आयोजित करत असतात, तेव्हा ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या जुलूसमध्ये फक्त ५ वाहनं आणि २५ लोकांना परवानगी देणं हे अयोग्य आहे, अशी नाराजी मुस्लिम समाजानं व्यक्त केली.

‘या’ आहेत मार्गदर्शक

  • शक्य तेवढं घरी राहून हा सण साजरा करावा.
  • जुलूस काढण्यासाठी आयोजकांना स्थानिक पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
  • मिरवणुकीत फक्त ५ ट्रकना परवानगी आहे.
  • एका ट्रकमध्ये फक्त ५ लोकांना परवानगी आहे.
  • जुलूसमध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल.
  • ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे.
  • जुलूसच्या स्वागतासाठी जर पंडाल बनवायचा असेल तर नियमांनुसार महानगरपालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं लागेल. पंडालमधील व्यक्तींची संख्या स्थानिक प्रशासन ठरवेल.
  • कंटेनमेंट झोनमध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही.
  • स्थानिक परिस्थिती पाहता, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला निर्बंध आणखी कडक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

यासंदर्भात रजा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी म्हणाले की, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत ५ ट्रकला परवानगी देण्यात आली आहे.

प्रत्येक ट्रकमध्ये फक्त ५ लोक चढू शकतात. अशा प्रकारे २५ लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयानं १० ट्रक आणि १५० लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती.

ते म्हणाले की, आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत. उच्च न्यायालयाने किमान जास्तीत जास्त लोकांना चेहल्लूम जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यायला हवी होती. नूरी म्हणाले की, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबतचे निवेदनही दिले आहे. त्यांना आशा आहे की सोमवारपर्यंत राज्य सरकार आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करेल.



हेही वाचा

यंदा गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाची पातळी अत्यंत कमी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा