Advertisement

सामाजिकतेच भान जपणारा दादरचा मानाचा गणपती


सामाजिकतेच भान जपणारा दादरचा मानाचा गणपती
SHARES

सध्या सर्व ठिकाणी बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गेले कित्येक महिने लाडक्या बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांच्या घरी किंवा मंडळात बाप्पा विराजमान झाला आहे. अशाच मुंबईतील काही निवडक गणपती मंडळाचा इतिहास, फोटो, वैशिष्ट्यांची माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी.


दादरचा मानाचा गणपती हे गणेश मंडळ दादर विभागातील सर्वात जुनं मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९५६ साली झाली. सामाजिक उपक्रमाकडे कल असलेल्या या मंडळाला यंदा ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं यंदाच्या वर्षी या मंडळानं 'गो ग्रीन'चा संदेश देणारा देखावा साकारला आहे. त्यासोबतच बाप्पांच्या अवतीभवती फुलांचं डेकोरेशनही करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मंडळात प्लास्टिक किंवा थर्माकोल बंदीच्या आधीपासूनच त्यांनी त्याचा वापर बंद केला होता.


'असं' मिळालं नाव

१९५६ साली विभागातील काही वरिष्ठ मंडळांनी सामाजिक ऐक्य आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी बालमित्र सार्वजानिक गणेशोस्त्व मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला या गणपतीला केवळ 'सार्वजनिक गणपती' या नावानं ओळखलं जात होतं. त्यानंतर काही भाविकांनी या गणपतीला नवस केले, ते पूर्ण झाल्यानंतर भाविकांनी दागदागिने देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर काही श्रद्धाळू भाविकांनी या बाप्पाला दादरचा मानाचा गणपती हे नाव दिलं. तेव्हापासून हा गणपती दादरचा मानाचा गणपती' या नावानं प्रसिद्ध झाला.


बाप्पाला वही पेनाचा नैवेद्य

दादरचा मानाचा गणपती हे गणपती मंडळ दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबावत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही हे मंडळ 'बाप्पाला दाखवा वही पेनाचा नैवेद्य' हा उपक्रम राबवत आहेत. यानुसार बाप्पाला नारळ, हार, फुल, किंवा फळ असं काहीही न आणता वही आणि पेन आणा असं आवाहन त्यांनी भक्तांनां केलं आहे. विशेष म्हणजे बाप्पाच्या मंडपाच्या बाहेरही त्यांनी फूल फळ याचं स्टॉल न लावता वही पेनाचे स्टॉल लावले आहेत.


उत्कृष्ठ देखावे सादर

गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळाने उत्कृष्ठ देखावे सादर केले आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबईत मलेरियाची साथ पसरली होती. त्यावेळी मलेरियापासून मुक्तीसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबावण्यात येत होत्या. याच उपाययोजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी या मंडळाने एक चलचित्र साकरलं होतं. त्याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्त झाल्याच्या वर्षी त्याचा क्रिकेट विश्वातील इतिहास सांगणारा देखावा तयार केला होता.


सामाजिक संदेश देणारे देखावे

विशेष म्हणजे दादरच्या परिसरातील गर्दीचा विचार करून हे मंडळ गणपतीच्या मूर्तीची स्थापना इमारती खालील मंदिरात करते. या मंदिरातच गणरायाची मूर्ती विराजमान असते. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, या हेतुने नेहमीच विविध सामाजिक संदेश देणारे हे मंडळाचे देखावे आणि सामाजिक उपक्रम पाहण्यासाठी अनेक भाविक इथं आवर्जून येतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा