• होळीसाठी बाजारपेठा सज्ज
SHARE

घाटकोपर - अवघ्या काही दिवसांवर होळी सण आला आहे. त्यासाठी बाजारही सज्ज झालाय. नाना प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. खास बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी छोटा भीम, अँग्री बर्ड, डोरेमोन आणि डोरा कार्टूनच्या पिचकाऱ्या बाजारात पाहायला मिळत आहेत. 

या कार्टून पिचकारीची किंमत 60 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आहे. जास्तीत जास्त पाणी राहू शकेल अशा स्कूल बॅग पिचकाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या