Advertisement

बाप्पाचे ऐका, जलप्रदूषण रोखा!


बाप्पाचे ऐका, जलप्रदूषण रोखा!
SHARES

एकीकडे पाण्याच्या थेंबाथेंबासाठी खेड्यापाड्यात, दुष्काळग्रस्त गावांत जीवघेणा संघर्ष सुरू आहे. पाण्यासाठी महिला, मुलींना मैलोन् मैल प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे जिथे पाण्याची सुबत्ता आहे, तिथे पाणी वाया घालवले जात आहे. वेळीच सावध व्हा आणि जलप्रदूषण रोखा! हाच संदेश आपल्याला देतोय प्रतिक्षानगर येथील बाप्पा!

प्रतिक्षानगर येथे म्हाडा कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या वसाहतीत गणेश मंच, माला गार्डन येथे गेल्या 43 वर्षांपासून प्रतिक्षानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा (म्हाडा स्टाफ व रहिवाशी संघ) च्या माध्यमातून बाप्पा विराजमान होत आहे. दरवर्षी म्हाडा कर्मचारी गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतात. पण त्याचवेळी या गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न नियमितपणे या मंडळाकडून केला जात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सु. रा. पालीवाल यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी या मंडळाने वृद्धाश्रम टाळा, माणुसकी पाळा असा संदेश देणारा देखावा साकारला होता. तर यंदा मंडळाने जलप्रदूषण या विषयावर देखावा साकारला आहे. मंडळाचे सचिव आणि म्हाडातील शाखा अभियंता अमृत कुबल यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातील खास आकर्षण म्हणजे सतीश कदम यांनी कविता. पाण्याचे महत्त्व सांगता सांगता माणसाने स्वार्थापोटी कशी जलसंपत्ती नष्ट करण्याचा डाव आखला हे सांगत आंतर्मुख करणारी ही कविता सर्वांच विचार करायला लावते.

जलप्रदूषण ही नैसर्गिक आपत्ती नाही तर ही मानव निर्मित आपत्ती आहे. त्यामुळेच आम्ही यंदा जलप्रदूषण रोखण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे पालीवाल यांनी सांगितले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा