का म्हणते मृणाल 'चेक युवर सेल्फ'?

दादर - 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून त्याच्या पुर्वसंध्येला अभिनेत्री आणि आता दिग्दर्शक म्हणून ओळखली जाणारी मृणाल कुलकर्णी हिच्याशी 'मुंबई लाइव्ह'च्या कार्यालयात गप्पा मारण्यात आल्या. मराठी, हिंदी सिनेमा किंवा मग अगदी मालिकांमधून स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेल्या मृणाल कुलकर्णी हिने फेसबुकच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. या वेळी मृणाल यांनी सगळ्यांशी भरभरून गप्पा देखील मारल्या. तिच्या आयुष्यात असणारे कुटुंबाचे स्थान, तिने गाठलेले पल्ले या सर्व गोष्टी तिने ‘मुंबई लाइव्ह’शी शेअर केल्या आहेत. तसेच महिलांचे बदलत जाणारे स्थान, समाजाची त्यांच्या बद्दलची विचार करण्याची वृत्ती या सर्व गोष्टींवर ती मनमोकळेपणाने बोलली.

Loading Comments