मुंबईकरांसाठी अलिबागची सफर

 Borivali
मुंबईकरांसाठी अलिबागची सफर

मुंबई - दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं (एमटीडीसी) सहलीसाठी अलिबागची खास दिवाळी पॅकेजेस लाँच केली आहेत. 30 ऑक्टोबरला ही सहल आयोजित करण्यात आलीय. सकाळी 7.30 वाजता गेटवे ऑफ इंडियापासून अलिबागचा सफर सुरू होईल. फेरीबोटीनं पर्यटक मांडव्यापर्यंत जातील. त्यानंतर पुढे दिमाखदार अशा मुरूड-जंजिरा किल्ल्यावर नेण्यात येईल. या टूरमध्ये पर्यटकांना अलिबाग-रोहा मार्गावरच्या साळवे गावाजवळचं बिर्ला मंदिर दाखवलं जाणाराय. याशिवाय अलिबाग, नागाव आणि किहीम या लोकप्रिय आणि निवांत समुद्रकिनाऱ्यावरही नेण्यात येणाराय. या सहलीबाबतच्या माहितीसाठी एमटीडीसीच्या 022-24211690/ 8422822028 या सेंट्रल रिझर्व्हेशन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Loading Comments