चौपाटीजवळ पोहोचला मुंबईचा राजा

गिरगाव - सकाळपासूनच होत असलेल्या पाऊस फुलांच्या वर्षावात, लाखो भक्तजनांना आशीर्वाद देत, मुंबईचा राजा असा लौकिक असलेला गणेशगल्लीचा गणपती गिरगाव चौपाटीजवळ पोहोचला आहे.

आज अनंत चतुर्दशीच्या दिवसाची सुरुवात झाली ती पावसाने. या मुसळधार पावसातही लाखोच्या संखेने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोटले आहेत. भक्तिमय आणि भावूक वातावरणात मुंबापुरीतील प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या गिरगाव चौपाटीवर विसर्जन सोहळा सुरू आहे. मुंबईतील प्रमुख गणपती असलेला मुंबईचा राजा चौपाटीजवळ दाखल झाल्यानंतर आता भाविकांना प्रतीक्षा आहे ती लालबागच्या राजाची.

 

Loading Comments