भांडुपमध्ये महिला बचत गटांचे स्टाॅल सजले

 Bhandup
भांडुपमध्ये महिला बचत गटांचे स्टाॅल सजले
भांडुपमध्ये महिला बचत गटांचे स्टाॅल सजले
भांडुपमध्ये महिला बचत गटांचे स्टाॅल सजले
भांडुपमध्ये महिला बचत गटांचे स्टाॅल सजले
See all

भांडुप - पश्चिमेकडील स्टेशन परिसरात असलेल्या दिना बामा पाटील इस्टेट इथे मम्मीज बचत गटातर्फे उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री सुरू आहे. इथं दिवाळी फराळासोबतच पणत्या, कंदील, अगरबत्त्या, विविध प्रकारची लोणची, गरम मसाले, साैंदर्य प्रसाधने, घरगुती उपयोगात येणाऱ्या छोट्या-मोठ्या वस्तू, सरबत तसंच लहान मुलांचे कपड्यांचे स्टाॅल उभारण्यात आलं आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून भांडुपकरांनी मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करत महिला बचत गटांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. या उपक्रमात संपूर्ण ईशान्य मुंबई परिसरातून तब्बल ५६ बचत गटांनी सहभाग नोंंदवला असल्याचं कार्यक्रमाच्या आयोजिका पल्लवी पाटील यांनी सांगितलं.

Loading Comments