Advertisement

नारळी पोर्णिमेसाठी मुंबईतील सर्व कोळीवाडे सज्ज

मुंबईतील कोळी वाड्यामध्ये अगदी पारंपारीक पद्धतीनं नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

नारळी पोर्णिमेसाठी मुंबईतील सर्व कोळीवाडे सज्ज
SHARES

'सण आयलाय गो... आयलाय गो... नारळी पुनवेचा' आणि 'नारळ सोन्याचा.. कोळी बांधवांचा..’, अशा विविध गाण्यांच्या तालावर ताल धरत मुंबईसह उपनगरातील सर्व कोळीवाड्यांमध्ये नारळी पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी मुंबईतील कोळी वाड्यामध्ये अगदी पारंपारीक पद्धतीनं नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मासेमारीच्या होडयांना रंग रंगोटी करणं, कोळीवाडा पताक्यांनी सजवणं, वाजत-गाजत मिरवणूक काढणं अशाप्रकारची जोरदार तयारी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळीवाड्यांमध्ये करण्यात येते.

संस्कृतीचं अनोखं दृष्य

मुंबईतील वेसावे, वरळी, धारावी, माहुल, माहीम, खारदांडा, जुहू, मढ, भाटी, मालवणी, मनोरी व गोराई कोळीवाड्यांमधील प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतो. या दिवशी कोळीवाड्यात कोळी समाजाच्या परंपरेचं आणि संस्कृतीचं अनोखं दृष्य पाहायला मिळतं.

नारळाच्या करंज्या मुख्य आकर्षण

चवदार नारळाच्या करंज्या हे कोळीवाड्यातील मुख्य आकर्षण असते. नारळी पोर्णिमेनिमित्त कोळीवाड्यात संध्याकाळी सजवलेल्या पालखीतून भव्य मिरवणुका काढली जाते. तसंच, कोळी वेषात कमरेला रुमाल बांधलेली पुरुष मंडळी आणि नऊवारी साड्या नेसलेल्या आणि सोन्याचे दागिन्यांनी मढलेल्या कोळी भगिनी या मिरवणुकीत कोळी गीतांच्या तालावर ठेका धरतात. त्याशिवाय, आलेल्या मान्यवरांना आणि राजकीय पुढारी यांना खास कोळी पेहराव्याच्या टोप्या भेट दिल्या जातात.

सागर देवतेला गाऱ्हाणं

संध्याकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन 'आम्हाला यंदा चांगली मासळी मिळू दे, आमच्या कुटंबाचं वादळ-वाऱ्यापासून रक्षण कर, अतिरेकी हल्यावर लक्ष ठेऊन आमच्या भारमातेचं रक्षण कर असं मनोभावे गाऱ्हाणं सागर देवतेला घातलं जातं. त्यानंतर कोळीवाड्यातील सुमुद्राला सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण केला जातो.

नारळ फोडण्याचा स्पर्धा

नारळी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर येथे हाताने नारळ फोडण्याचा स्पर्धा चांगल्याच रंगतात. तसंच, सुमारे एक महिनाभर चालत असलेल्या या नारळ फोडण्याच्या स्पर्धेत हजारो नारळ फुटत असतात. ज्याच्या हातातील नारळ फुटेल त्याच्या प्रतीस्पर्धेला नारळ मिळतो.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९ : 'या' दिवशी होणार तुमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा