Advertisement

वसईत विसर्जनासाठी 'तलाव आपल्या घरी' संकल्पना

गणेश विसर्जनावेळी गर्दी होऊ नये म्हणून सरकारकडून नियमावलीही जारी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी वसईत आता अनोखी संकल्पना राबवण्यात येत आहे.

वसईत विसर्जनासाठी 'तलाव आपल्या घरी' संकल्पना
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा रण्यात येत आहे. गणेश विसर्जनावेळी गर्दी होऊ नये म्हणून सरकारकडून नियमावलीही जारी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी वसईत आता अनोखी संकल्पना राबवण्यात येत आहे.  वसईत गणेश विसर्जनासाठी ‘तलाव आपल्या घरी’ ही संकल्पना राबवली जात आहे.

गणपती विसर्जनस्थळावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून वसई तालुक्यात ७२ कृत्रिम फिरत्या तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व कृत्रिम फिरते तलाव वाहनांवर सज्ज झाले आहेत.

 ज्या गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्तींची नोंदणी बविआ कार्यकर्ते यांच्याकडे केली आहे त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याच सोसायटीत सर्व विधी करून गणेशाचं विसर्जन केलं जाणार आहे. प्रत्येक प्रभागनिहाय ‘तलाव आपल्या घरी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेतर्फेही त्येक भागात कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. तसंच फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्थाही केली जाणार आहे. तसंच नवी मुंबई महापालिकेने विसर्जनसाठी १३५ कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. तसंच कंटेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.हेही वाचा -

Ganpati Festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन

आश्चर्य! गणेशोत्सवात पहिल्यांदाच लालबाग, परळ शांत


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement