कोजागरी पौर्णिमा

  Mumbai
  कोजागरी पौर्णिमा
  मुंबई  -  

  आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. दर महिन्यात पौर्णिमा येते, मात्र या पौर्णिमेचं खास वैशिष्ट्य आहे. हिंदू धर्मातही या पौर्णिमेला विशेष स्थान देण्यात आलंय. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे. तसंच उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.

  या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ,साखर वगैरे साहित्य घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध प्रसाद म्हणून वाटले जाते. कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. या दिवशी शंकर देवाला गायीच्या दूधापासून बनवण्यात आलेली खीर नैवेद्य म्हणून दाखवली जाते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.