Advertisement

janmashtami: मुंबईतील ‘या’ ५ प्रसिद्ध ठिकाणी साजरी होऊ शकली नाही गोकुळाष्टमी

देशातील इतर भागांप्रमाणेच मुंबई-ठाण्यात अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनमुळे दहीहंडी उत्सवावर पाणी फेरलं गेलं आहे.

janmashtami: मुंबईतील ‘या’ ५ प्रसिद्ध ठिकाणी साजरी होऊ शकली नाही गोकुळाष्टमी
SHARES

देशातील इतर भागांप्रमाणेच मुंबई-ठाण्यात अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनमुळे दहीहंडी उत्सवावर पाणी फेरलं गेलं आहे. थरांवर थर रचून उंच मानवी मनोरे उभे करणं हे मुंबईतील दहीहंडी उत्सवाचं वैशिष्ट्य. केवळ सण-उत्सवापुरतं मर्यादीत न राहता या अनोख्या खेळ प्रकाराने जगभरातील क्रीडा रसिकांनाही भुरळ पाडली. भलेही या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत नसला, तरी मुंबई-ठाण्यातील प्रसिद्ध दहीहंडी उत्सव मंडळ आपापल्या परीने सर्वसामान्यांना मदत करत उत्सवाची परंपरा जपत आहेत. (no janmashtami and dahi handi celebration in thane and mumbai this year due to coronavirus)

१. संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र यांच्या आव्हाड पुढाकाराने ठाण्यातील पाचपखाडीत आयोजित करण्यात येणाऱ्या या दहीहंडी मंडळाची ओळख सातासमुद्रापार जाऊन पोहोचलेली आहे. मानवी मनोरे रचण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या स्पेनच्या खेळाडूंनीही इथं आपल्या कलेचं प्रदर्शन केलेलं आहे. दरवर्षी उंच मनोरे रचण्याचा विक्रम आणि मोठ्या रकमेचं पारितोषिक यामुळे ही दहीहंडी चर्चेत असायची. परंतु यावर्षी मंडळाचे कार्यकर्ते लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या आपल्या विभागातील सर्वसामान्यांची मदत करण्यात गुंतलेले आहेत.

२. संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी, वरळी 

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले नेते सचिन अहिर यांच्या पुढाकाराने मुंबईतील वरळीत या दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. वरळीतील जांबोरी मैदानावर आयोजित होणारी ही दहीहंडी मुंबईतील सर्वात उंच दहीहंडी म्हणूनही प्रसिद्ध आहे. बाॅलिवूड कलाकार आणि इतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे ही दहीहंडी नेहमीच चर्चेत असायची. परंतु सलग दोन वर्षे या दहीहंडीचं आयोजन रद्द करण्यात येत आहे.

हेही वाचा - Dahi Handi Festival: यंदा दहिहंडी रद्द, तरीही पथकांकडून दहीहंडीचं पूजन 

३. संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणारी ही दहीहंडी ठाण्यातील आणखी एक प्रसिद्ध दहीहंडी म्हणून ओळखली जाते. वर्तकनगर भागात या दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. याच दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाने २०१२ साली ४३.७९ फुटांचे ९ थर रचून गिनिज विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. धमाल मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यामुळे देखील ही दहीहंडी लक्षात राहते.

४. राम कदम दहीहंडी, घाटकोपर

भाजपचे आमदार राम कदम यांच्यामार्फत येथील दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. अनेक बाॅलिवूड सेलिब्रिटींना या दहीहंडीसाठी आमंत्रित केलं जातं. या दहीहंडी कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान होणाऱ्या वादविवादांमुळे देखील ही दहीहंडी अनेकांचं लक्ष वेधून घेते हे विशेष. 

५. इस्काॅन टेंपल, जुहू

जुहूतील प्रसिद्ध हरे रामा हरे क्रिश्ना मंदिरात दरवर्षी अत्यंत पारंपारीक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. अतिशय भक्तिभावाने श्रीकृष्ण आणि राधेची पूजाअर्चा केली जाते. दरवर्षी या कार्यक्रमाला देशविदेशातून भाविक उपस्थित राहतात. परंतु यावर्षी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

हेही वाचा - Dahi Handi Festival 2020: यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा