नियम मोडल्यास गोविंदा पथकच जबाबदार- समिती

‘नियम मोडणाऱ्या पथकांवर कारवाई झाल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पथकाचीच राहील,’ अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने घेतली आहे.

SHARE

दहिहंडी उत्सवाला आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिली असून, सर्व गोविंदा पथकांमध्ये उत्साह पाहायला मिळतं आहे. या उत्साहापायी अनेक गोविंदा पथक दरवर्षी दहीहंडी समन्वय समितीच्या आणि पोलिसांच्या नियमांचं उल्लघन करतात. त्यामुळं यंदा ‘नियम मोडणाऱ्या पथकांवर कारवाई झाल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पथकाचीच राहील,’ अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने घेतली आहे. तसंच, सर्व गोविंदा पथकांनी विमा काढावा व पोलीस परवानगीशिवाय दहीहंडी उत्सवात उतरू नये’, असं आवाहनही दहीहंडी समन्वय समितीनं केलं आहे.

समितीचे नियम

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी गोविंदा पथकांनी १४ वर्षांखालील मुलांना वरच्या थरावर चढवू नये. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हार्नेस बेल्ट, चेस्ट गार्ड आणि प्रोटेक्टर इत्यादी सुरक्षा साधनांचा वापर करावा, अशा सूचना समितीनं पथकांना दिल्या आहेत.

गोविंदा पथकांची नोंदणी

दरम्यान, मुंबईसह उपनगरातल्या गल्लीबोळातील अनेक गोविंदा पथकांची नोंदणी नसते. अशा पथकांमध्ये होणारे अपघात आणि रस्त्यावर वाहनांनी होणारे अपघातही दहीहंडीमुळं झाल्याचं दाखवलं जातातं. त्यामुळं हंडी फोडायला आलेल्या पथकाची पोलीस परवानगी तसेच वरच्या थरावर चढणाऱ्या मुलाचा जन्मदाखला पाहण्याची जबाबदारी आयोजकांची असल्याचे समितीनं सांगितलं आहे.हेही वाचा -

कल्याण-ठाणे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार, लालबागमध्ये अज्ञातांनी वाटली पत्रकंसंबंधित विषय
ताज्या बातम्या