Advertisement

या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार, लालबागमध्ये अज्ञातांनी वाटली पत्रकं

मुंबईतील लालबाग परळ परिसरात 'ईडी'विरोधात अज्ञातांनी काही पत्रकं वाटल्याचा प्रकार घडला आहे

या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार, लालबागमध्ये अज्ञातांनी वाटली पत्रकं
SHARES

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील लालबाग परळ परिसरात 'ईडी'विरोधात अज्ञातांनी काही पत्रकं वाटल्याचा प्रकार घडला आहे. 'या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार' अशा आशयाची पत्रकं लालबाग परळ परिसरात वाटण्यात आली होती.

पत्रकातील प्रश्न

  • नोटबंदीनंतर अमित शाह संचालक असलेल्या बँकेमध्ये केवळ ५ दिवसांमद्ये ७४५ कोटी रूपये कसे जमा झाले?
  • अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीने एका वर्षात १६ हजार पट नफा कसा मिळवला?
  • प्रविण दरेकरांचा मुंबै बँक घोटाळा भाजपा प्रवेशानंतर कसा विस्मरणात गेला?
  • मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कार्यरत असलेल्या अॅक्सिस बँकेला पोलिसांची खाती उघडण्याची परवानगी कशी देण्यात आली?
  • प्रकाश महेतांच्या जमीन घोटाळ्यांची चौकशी कोण करणार?


कारण अस्पष्ट

यांसारखे अनेक सवाल या पत्रकातून करण्यात आले आहेत. ही पत्रकं लालबाग परळ या भागामध्ये दिसून आली. मात्र, कोणी वाटली आणि यामागे नक्की कारण काय याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी ६ विशेष गाड्या

चौकशी राज ठाकरेंची झोप उडाली पोलिसांचीसंबंधित विषय
Advertisement