Advertisement

पंचगंगा मंडळाला महापालिकेचा ‘गणेश गौरव पुरस्कार’


पंचगंगा मंडळाला महापालिकेचा ‘गणेश गौरव पुरस्कार’
SHARES

मुंबईतील गणपती केवळ उंचीसाठीच नव्हे, तर मूर्तीचे रूप, आकर्षक सजावट आणि देखाव्यांसाठीही प्रसिद्ध आहेत. विविध देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुढाकार घेतात. अशा सर्वच बाबतीत सरस असणाऱ्या मंडळाच्या गणपतीला मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी ‘गणेश गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येतं. 

महापालिकेनं यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली असून ना. म. जोशी मार्ग येथील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं या स्पर्धेत पहिलं स्थान पटकावलं आहे. या मंडळाला ७५ हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल.
तर युवक उत्कर्ष मंडळ, गेट क्र. ६, मालवणी, मालाड (प) आणि श्री गणेश क्रीडा मंडळ, चकाला, अंधेरी (पू) या मंडळांनी अनुक्रमे दुसरा (५० हजार रु.) आणि तिसरा (३० हजार रु) क्रमांक पटकावला आहे.

मुंबई महापालिकेतर्फे १९८८ पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेत एकूण ६३ गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते. परीक्षक मंडळाने सर्व गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती आणि देखाव्याचं परिक्षण करून विविध श्रेणीतील विजेत्यांची निवड केली.

वैयक्तिक श्रेणीत बाळ गोपाळ मित्र मंडळ (विलेपार्ल्याचा पेशवा), विलेपार्ले (पू) यांना २५ हजार रुपयांचं पारितोषिक, तर धी वरळी आंबेडकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी यांना २० हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल.


इतर श्रेणीतील विजेते पुढीलप्रमाणे :

उत्तेजनार्थ दोन पारितोषिक ( प्रत्येकी १० हजार रु.)

  1. पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राणीबाग
  2. नवतरूण मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोकणी पाडा, दहिसर (पू)


शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती (पारितोषिक - २५ हजार रु.)

  • ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव


अवयवदान जागृती (पारितोषिक - १५ हजार रु.)

  • विकास मंडळ, साई विहार, भांडुप, (प)


उत्कृष्ट मूर्ती

  1. पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना. म. जोशी मार्ग
  2. श्री गणेश क्रीडा मंडळ, चकाला, अंधेरी (पू)
  3. इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लब, धारावी
  4. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर, दहिसर
  5. सुभाष नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ सांताक्रूझ (पू)


उत्कृष्ट नेपथ्य

  1. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मरोळ, अंधेरी (पू)
  2. बाल मित्र कलामंडळ, विक्रोळी (प)
  3. श्री शक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरमार्ग (प)


उत्कृष्ट प्रबोधन

  1. श्री साईदर्शन मित्र मंडळ बोरीवली (प)
  2. पालनजी रतनजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भायखळा (पू)
  3. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हनुमान चौक, मालवणी, मालाड (प)
  4. गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळाचौकी


पर्यावरण संवर्धन

  1. श्री गोलदेऊळ सार्वजनिक उत्सव मंडळ, गिरगाव
  2. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्हिलेज रोड, भांडुप (प)
  3.  रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर


सामाजिक कार्य 

  1. साईराज गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ले (पू)
  2. जय महाराष्ट्र सेवा मंडळ, कांदिवली (प)
  3. सार्वजनिक गणेशोत्सव समिती, सिद्धीविनायक सभागृह, विक्रोळी (पू)
  4. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क, बोरीवली (प)
  5. स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरी (प)



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा