Advertisement

फोटो गॅलरी : दोन वर्षांनंतर विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, पहा फोटो

गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर लोकांनी गर्दी केली होती.

फोटो गॅलरी : दोन वर्षांनंतर विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, पहा फोटो
SHARES

दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शुक्रवारी बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर एकच गर्दी उसळली होती.

गिरणगावचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांची प्रचंड गर्दी होती.  

चिंचपोकळीचा चिंतामणीचे जल्लोषात विसर्जन...

गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी लोक घराच्या छतावर आले होते.

कोरोनामुळे उत्सवात २ वर्षांचा खंड पडला होता. पण यावर्षी निर्बंध हटवल्याने जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लोक जल्लोषात नाचतानाही दिसले.

बाप्पाच्या दर्शनासाठी लोक सकाळपासून घरांच्या बाल्कनीत आणि दुकानांच्या गच्चीवर उभे असल्याचे दिसून आले.

प्रखर सूर्यही भाविकांची हिम्मत नाही तोडू शकला. 

यंदा गणेशमूर्तींच्या उंचीवर कोणतेही बंधन नसल्याने सर्वच मंडळांनी एकापेक्षा एक अशा उंच मूर्ती बसवल्या होत्या.

गणेशमूर्तींच्या उंचीबरोबरच या वेळी मूर्तींना अधिक आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते.

नवसाला पावणारा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी झाली होती.

नोटांच्या हारासोबतच बाप्पावर फुलांचा वर्षावही करण्यात आला.

बाप्पाच्या निरोपात लहान मुलांनीही जल्लोष केला.

ढोल ताशे, डीजेच्या तालावर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

मुंबईचा राजा गणेश गल्लीतही बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

गर्दी हाताळण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाला तयारी करावी लागली.

कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव थाटामाटात साजरा होऊ शकला नाही. मात्र यंदा गणेशोत्सवानिमित्त भाविकांच्या दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा