मोटारसायकल रॅलीतून शिवरायांचा जागर

 Mumbai
मोटारसायकल रॅलीतून शिवरायांचा जागर

भोईवाडा - जय भवानी जय शिवाजी या जयघोषाने बुधवारी परळ (पू.) भोईवाडा येथील सदाकांत ढवण मैदान दुमदुमून गेले. शिवसेना वडाळा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने बुधवारी शिवजन्मोत्सव सोहळा 2017 साजरा करण्यात आला. शिवरायांचा जागर करत भव्य मोटारसायकल शोभायात्रा काढण्यात आली.

या सोहळ्यात अंगाचा थरकाप उडवणारे मर्दानी खेळ त्यात लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, कुऱ्हाड आदी प्रात्यक्षिके साहसी युवक-युवतींनी करून दाखवल्यामुळे प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर स्वरतालीम ढोल ताशा आणि ध्वज पथक मुंबई नाद स्वरांचा या पथकांनी ढोल ताशा वाजवून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता न करता वडाळा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने भव्य मोटारसायकल शोभायात्रा शिवरायांचा जागर करून काढण्यात आल्याने सर्व परिसर दणाणून गेला. या सोहळ्यात उप विभागप्रमुख राकेश देशमुख, माजी नगरसेवक मुकुंद पंड्याळ, माजी नगरसेवक हेमंत डोके, माजी शाखाप्रमुख सुरेश काळे, उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर, रचना अग्रवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments