भाजप उत्तर भारतीयांना करणार आकर्षित

 Pali Hill
भाजप उत्तर भारतीयांना करणार आकर्षित
भाजप उत्तर भारतीयांना करणार आकर्षित
भाजप उत्तर भारतीयांना करणार आकर्षित
भाजप उत्तर भारतीयांना करणार आकर्षित
See all

मुंबई - साई भक्तांनंतर आता भाजप पक्ष मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईमध्ये जुहू आणि पवईसह १२ ठिकाणी भाजपातर्फे छट पूजेचं आयोजन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजपवर टीक केली होती. 'निवडणुका जवळ आल्यावर भाजपला छटपूजेचे आयोजन सुचतं, निवडणुका संपल्यावर छटपूजेच्या आयोजनाचा विसर पडतो असा टोलाही संजय निरुपम यांनी लगावला'. जुहू चौपाटीवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी छट पूजेचं आयोजन केलं आहे. यासह कुर्ला, पवई, चेंबूर, संजय गांधी पार्क, कुलाबा, शिवाजी पार्क, जुहू, बोईसर, वर्सोव्हा, मालाड, अक्सा, भांडुप, मुलुंड या ठिकाणीही भाजप छट पूजेचं आयोजन करणार आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना छटपूजेच्या राजकीय कार्यक्रमाला विरोध केला आहे. या वेळी भाजपद्वारे जुहू चौपाटीवर आयोजित केलेल्या छट पूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

Loading Comments