घाटकोपर - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राम कदम यांनी 25 हजार भाविकांना मोफत शिर्डी यात्रा घडवून आणली. या यात्रेत वयोवृद्ध पुरुष-महिला, बालक आणि तरुणसुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता शिर्डी यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यात्रेसाठी विक्रोळी पार्कसाइट, घाटकोपर (प.) आणि अमृतनगर येथून पाचशे खासगी बस सोडण्यात आल्या. या वेळी भाविकांसाठी सकाळची न्याहारी, चहा, आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. आमदार राम कदम, घाटकोपर पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष रवी पूज आदी मंडळी देखील या यात्रेत सहभागी झाले.
