शिवडी ते शिर्डी पदयात्रा

 Sewri
शिवडी ते शिर्डी पदयात्रा
शिवडी ते शिर्डी पदयात्रा
See all

शिवडी - दरवर्षीप्रमाणे यंदाही नाखवाची वाडी येथील ओम साई लक्ष्मी सेवा मंडळाच्या वतीनं रविवारी शिवडी ते शिर्डी पालखीसह भव्य पदयात्रा काढण्यात आली.

या वेळी पद यांत्रिकांनी ढोल, ताशा वाजवत मनोरा रचला यामुळे संपूर्ण शिवडी परिसर दुमदुमला. शिवडीतील ओम साई लक्ष्मी सेवा मंडळ गेली सात वर्षे कार्यरत आहे. आठवडाभर चालणाऱ्या या पदयात्रा सोहळ्यात चालताना लाभणारी निसर्गाची सोबत, त्यामध्ये साईबाबांच्या होणाऱ्या आरत्या, कर्णमधूर भजन आणि भगवंतांच्या, सद्गुरूंच्या नामाचा घोष यामुळे पदयात्रेत सहभागी झालेल्या भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

Loading Comments