चेंबूरमध्ये शिवजयंती उत्साहात


SHARE

चेंबूर - दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चेंबूर परिसरात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला. चेंबूरमधील सुभाषनगर, खारदेवनगर, पांजरापोळ, सांडूवाडी, चेंबूर नाका, वाशी नाका, वाडवली गाव, विजयनगर, चेंबूर कॉलनी, लाल डोंगर आणि सिद्धार्थ कॉलनी या भागात बुधवारी विविध देखावे उभारण्यात आले होते. तसंच अनेक ठिकाणी शिवजयंती निमित्त सत्यनारायणाची पुजा देखील आयोजित केली होती. चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात शिवसेना आणि मनसेने मोठ-मोठे देखावे उभे केल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. प्रत्येक गल्ली-गल्लीमध्ये भगव्या पताका लावण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या