पिंपळेश्वर मंडळाचा शिवराय महापालिकेत विराजमान

 Masjid Bandar
पिंपळेश्वर मंडळाचा शिवराय महापालिकेत विराजमान

मस्जिद - शिवजयंती निमित्ताने मस्जिदच्या साबू सिद्धिकी रोड भागात महापालिकेच्या इमारतीचा देखावा उभारण्यात आला. या देखाव्यानिमित्ताने संपूर्ण महापालिकाच या भागात उभारली गेली होती. या देखाव्या बरोबरच वृक्ष लावण्याचा संदेश देखील पिंपळेश्वर मंडळाने दिला. तर मनोरंजनाच्या हेतूने या भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात नृत्य स्पर्धा, वेशभूषा आणि कलाश्रृंगार, ब्रास बँड पथकाचे सादरीकरणही यात करण्यात आले होते. तर यंदाच्या शिवजयंतीच्या निमित्ताने उभारण्यात आलेला महापालिकेचा मनोहारी देखावा सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनला होता. या सजावटीची कल्पना वामन लाड आणि आनंद म्हाईंगळे यांची होती.

Loading Comments