वाळकेश्वरमध्ये गुढीपाडव्याची धूम

Mumbai  -  

वाळकेश्वर- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू नूतन वर्षाच्या निमित्त संपूर्ण मुंबईत उत्साहाचं आणि जलोष्षाचं वातावरण आहे. असंच काही वातावरण वाळकेश्वर येथे पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्या निमित्त वाळकेश्वर तीन बत्ती येथून मोठी शोभा यात्रा काढण्यात आली.

या शोभा यात्रेत हिंदु, मुस्लिम, ख्रिस्त असे सर्वच धर्माचे लोकांनी सहभाग घेतला. तसंच
पारंपरिक वेशभूषा करुन या सर्वांनीच शोभा यात्रेची शोभा वाढवली. तसंच शोभा यात्रेत लेझीम आणि मराठा मर्दानी खेळाच्या प्रदर्शनामुळे चार चांद लागले. या शोभा यात्रेला सकाळी ८ वाजता तीनबत्ती साई बाबा बस स्थानका परिसरातून सुरुवात झाली. खंडोबा मंदिर,जबरेश्वर गल्ली, बाणगंगा चौक, भगवान इंद्रजीत मार्ग, माता पार्वती नगर करत प्रेमनगर येथे संपन्न होणार आहे.

Loading Comments