धूम चेटीचंदची...

    मुंबई  -  

    खारघार - बुधवारी सिंधी समाजाने 'चेटीचंद'चा उत्साह साजरा केला. चेटीचंद म्हणजे सिंधी समाजाचे नवीन वर्ष. चेटीचंदच्या निमित्ताने मुंबईच्या खार जिमाखाना येथे सिंधी समाजाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमाची सुरुवात सिंधी समाजाचे दैवत असलेल्या झुलेलाल देवाची पूजा करून करण्यात आली. यावेळी सिंधी समाजातील लोकांनी सिंधी समाजाच्या विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाला सिंधी अभिनेत्री भारती छाबियाने देखील हजेरी लावली होती. सिंधी समाजातील तरुणांनी सिंधी भाषेवर प्रेम करावे असं सांगत सिंधी समाजाची संस्कृती जपण्याचे आवाहन अभिनेत्री भारती छाबियाने केले. 

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.