Advertisement

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शनिवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
SHARES

शनिवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.

नार्वेकर यांनी म्हटलं की, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याचप्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावं. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचं पालन करावे.

मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, हातांची स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी. यामुळे सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार आपण रोखू शकू. सर्व नागरिकांनी या त्रिसुत्रीचे पालन करावं व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केलं आहे.हेही वाचा

मलेरियावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश

धक्कादायक! तपासणी केली नसतानाही कोरोना पॉझिटिव्हRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा