Advertisement

सांताक्लॉज देणार स्वच्छतेचा संदेश


SHARES

परळ- ख्रिसमस म्हटलं की सगळ्यांना आठवतो तो सांताक्लॉज. सर्वांना आकर्षित करणारा आणि बच्चे कंपनीला आवडणारा सांताक्लॉज नेहमी गिफ्ट आणि चॉकलेट वाटताना आपण पाहतो. मात्र आता हाच सांताक्लॉज देणार आहे स्वच्छतेचे धडे. पालिकेच्या एफ-दक्षिण विभागात संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेचे धडे देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. यासाठी खास निवडलाय तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका सांता.10 दिवस चालणाऱ्या या स्वच्छता मोहिमेचं उद्घाटन उपायुक्त आनंद वाघराळकर, सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, प्रभाग समिती अध्यक्ष हेमांगी चेंबूरकर नगरसेवक सुनील मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. बच्चेकंपनीसह सगळ्यांचा आवडता सांता स्वच्छतेचे धडे देणार म्हटल्यावर त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळणार यात तिळमात्र शंका नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा