Advertisement

यंदाच्या दहीहंडी उत्सवावर कोरोनाचं संकट


यंदाच्या दहीहंडी उत्सवावर कोरोनाचं संकट
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरताली उत्सवांवर मोठं संकट येण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहीहंडी उत्सवात लोणी लुटायला मिळेल का? असा सवाल गोविंदा पथकांना पडला होता. मात्र या वर्षीही मानाच्या हंड्या फुटणार नाहीत. राज्य सरकारच्या नियमावली व कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामुळं यंदाही साधेपणाने साजरा केला जात आहे.

दहीहंडी फोडताना थराथर रचले जातात. एका संघात किमान १०० हून अधिक गोविंदांचा समावेश असतो. नेहमी दहीहंडी उत्सवासाठी मे अखेरपासून मोठ्या पथकांचा सराव सुरू होतो. मात्र, यंदा सोशल डिस्टन्सिंगमुळं सरावाला अजून सुरूवात झाली नाही.

दरम्यान दादरची बाजारपेठ हंड्या व फुलमाळा घेण्यासाठी नेहमी गजबजलेली पाहायला मिळते. त्यानुसार, यंदाही नागरिकांनी दहीकाला उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरदेसाठी गर्दी केली आहे. विविध रंगीत मटकी, फुलमळा विक्रीसाठी आल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा