मुंबईत तिरुपती बालाजीचं दर्शन

 Chembur
मुंबईत तिरुपती बालाजीचं दर्शन
मुंबईत तिरुपती बालाजीचं दर्शन
मुंबईत तिरुपती बालाजीचं दर्शन
See all

चेंबूर - मुंबईकरांना लवकरच मुंबईत तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणाराय. 8 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत चुनाभट्टीतील समोय्या मैदानात श्री वेकाटाश्वरा वैभव उत्सव साजरा होतोय. तिरुपती देवस्थान आणि राधा फाउंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने याचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये तिरुपती बालाजींचा देखावा उभारण्यात येणार असल्याचं आयोजक खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं. ज्यांना तिरुपतीला जाता येत नाही अशा लोकांसाठी ही खास सोय करण्यात आलीय. पाच दिवस इथं पूजा करण्यात येणाराय. मात्र त्यासाठी आॅनलाईन बुकिंग करावं लागणाराय. शुक्रवारी शेवाळे आणि तिरुपती देवस्थानमधील कमिटीनं सोमय्या मैदानाची पहाणी केलीय. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचं या वेळी शेवाळे यांनी सांगितलं.

Loading Comments