Advertisement

घरगुती गणपती बाप्पांना फायबरची प्रभावळ

परळ वर्क शॉप येथील 'कलासागर आर्ट' या घरगुती गणेश मुर्तींच्या कार्यशाळेत मुर्त्यांना फायबरची प्रभावळ लावली जात आहे. तसंच ही प्रभावळ सहज काढताही येते. त्यामुळं पुढच्या वर्षी सुद्धा या प्रभावळीचा उपयोग होऊ शकतो.

घरगुती गणपती बाप्पांना फायबरची प्रभावळ
SHARES

मुंबईमध्ये आतापर्यंत फक्त सार्वजनिक गणेश मुर्त्यांनाच फायबरची प्रभावळ लावण्यात येत होती. सार्वजनिक गणेश मुर्त्यांचं वजन जास्त असल्यामुळं त्या उचलणं गणेश मंडळांना जड पडत होतं. त्यामुळं या मुर्त्यांचं वजन कमी करण्यासाठी त्यांना फायबर प्रभावळ लावली जाते. पण आता घरगुती गणपतींनादेखील फायबरची प्रभावळ लावली जात आहे. त्यामुळं घरगुती मुर्त्या उचलणं अधिकच सोपं होणार आहे.


प्रभावळ काढताही येते

परळ वर्क शॉप येथील 'कलासागर आर्ट' या घरगुती गणेश मुर्तींच्या कार्यशाळेत मुर्त्यांना फायबरची प्रभावळ लावली जात आहे. तसंच ही प्रभावळ सहज काढताही येते. त्यामुळं पुढच्या वर्षी सुद्धा या प्रभावळीचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणं पीओपीपेक्षा फायबरच्या प्रभावळीवर कोरीव काम करणं अधिक सोपं जातं. या कार्यशाळेतील २ ते ३ फुटांच्या गणेश मुर्तींची किंमत ६ हजार पासून १५ ते १८ हजार रुपयांपर्यंत आहे.


पीओपी प्रभावळ जड

मुर्तीकार घरगुती गणेश मूर्ती साधारणत: पीओपी आणि शाडू मातीचे बनवतात. मात्र, या मुर्त्यांच्या प्रभावळीचं वजन जास्त असल्यामुळं मुर्ती घरी आणतेवेळी आणि विसर्जनावेळी उचलणं खूपचं जड जायचं त्याचप्रमाणं एखादी मूर्ती २ ते ३ फुटांची असेल तर ती मूर्ती उचलण्यासाठी २ माणसांची गरज भासते.  



प्रभावळमुळं गणपतीच्या मुर्तीचं वजन अधिक जास्त होतं. त्यामुळं हे वजन कमी करण्यासाठी आम्ही घरगुती गणेश मुर्त्यांना फायबरची प्रभावळ लावत आहोत. फायबरच्या प्रभावळीचं वजन अगदी कमी असतं.
- वैभव माने, मुर्तीकार, कलासागर आर्ट



हेही वाचा -

राखी, गणेशमूर्ती जीएसटीमुक्त

गोविंदांचा विमा १० लाखांचा!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा