वरळीत वट पोर्णिमा उत्साहात साजरी

Worli
वरळीत वट पोर्णिमा उत्साहात साजरी
वरळीत वट पोर्णिमा उत्साहात साजरी
वरळीत वट पोर्णिमा उत्साहात साजरी
See all
मुंबई  -  

वट पौर्णिमेचा उत्साह गुरुवारी सगळीकडे पहायला मिळाला. वरळीमध्ये सुवासिनींनी विठ्ठल रखुमाई मंदिराजवळील वटवृक्षाची पूजा केली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी तुरळक प्रमाणात पहायला मिळाली. तर दुसरीकडे गोपाळनगर येथील शंकर मंदिराजवळील वटवृक्षाची पूजा अनेक महिलांनी सायंकाळच्या वेळेत केली.विशेष म्हणजे यंदा आंबा बाजारात स्वस्त असल्यामुळे वाणांमध्ये आंबा दिसत होता. यंदा शेतकरी संपामुळे काही प्रमाणात फळांचा तुटवडा असूनही, त्याचा परिणाम मात्र या सणावर झाला नाही.

दरवर्षी वटपोर्णिमा, मकर संक्रांती या सणांचा बीडीडी चाळीत एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. यंदा देखील तोच उत्साह पहायला मिळाला. हिंदू संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे अनेक सुवासिनींनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोठ्या वटवृक्षाची पूजा केली. त्याचप्रमाणे कामाची घाई असणाऱ्या अनेक महिलांनी सकाळी सूर्योदयापासून 12.30 पर्यंतच्या मुहूर्तामध्ये कुंडीतल्या वटवृक्षाची देखील पूजा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.