स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2017ची सांगता

 Matunga
स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2017ची सांगता

माटुंगा - मुंबईतल्या माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2017 या कार्यक्रमाची सांगता रविवारी झाली. यामध्ये दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. दिल्या गेलेल्या विविध विषयांवर सलग 36 तास काम करून देशाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हॅकथॉन या कार्यक्रमातून करण्यात आला. त्यानंतर समीक्षकांनी निवडलेल्या विजेत्यांना बक्षिस देऊन गौरवले. यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या बी. पी. पोद्दार व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (कोलकता) येथील ब्रेनटॉमार रेडिओनोमार यांना पारितोषिक म्हणून रोख 1 लाख रुपये आणि करंडक देण्यात आले.

तर द्वितीय क्रमांंकाचे मानकरी ठरलेल्या मुंबईतील व्ही. जे. टी. आय महाविद्यालयातील टेक जंक्किसला रोख रक्कम 75 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेज फॅकल्टी इंजिनियरिंग मोहाली येथील संघ (TRE-X) यांना रोख रक्कम 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर या मध्ये प्रेरणादायक ठरलेल्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधल्या संकल्प या संघाला रोख रक्कम 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उर्वरित उत्तेजनार्थ संघांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. तर वेलिंगर इन्स्टिट्यूटमधील स्थानिक कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि संचालक देखील उपस्थित होते.

Loading Comments