• का साजरी करतात कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या...
  • का साजरी करतात कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या...
SHARE

सर्वसामान्यपणे दसरा झाल्यानंतर लोकांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे! नवरात्रौत्सवात गरबा दांडिया खेळून झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेलाही दांडिया खेळण्याचा प्रघात काही ठिकाणी आहे. त्यामुळेही तरुण मंडळी कोजागिरी पौर्णिमेची वाट पहात असतात. पण नक्की काय आहे कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व? ती का साजरी केली जाते?कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व

अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ही 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणून ओळखली जाते. ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा असल्याने तिला 'अश्विनी पौर्णिमा' असे देखील म्हणतात. पावसाळा संपल्यानंतर कोजागिरी ही पहिली पौर्णिमा येते. आकाशात काळ्या कुट्ट ढगाळ वातावरणाचे साम्राज्य संपल्यानंतर या पौर्णिमेला येणारी चंद्राची किरणे मनाला सुखावतात. त्यामुळेच या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दसऱ्यानंतर कोजागिरी साजरी करतात. वैज्ञानिकदृष्ट्या कोजागिरीच्या दिवशी चंद्रकिरणे शितल असतात.दूधच का?

या दिवशी चंद्राला केशर घातलेले आटीव दूध नैवेद्य म्हणून दाखवले जाते. कारण या दिवशी आकाश स्वच्छ असते आणि चंद्राप्रमाणे दुधाचा रंगही पांढरा शुभ्र असतो. त्यामुळेच या दिवशी चंद्राला नैवेद्य म्हणून दूध दाखवण्याची प्रथा आहे.  


लक्ष्मी आणि कुबेराची आकाशभ्रमंती?

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ८५ हजार किलो मीटर अंतरावर आणि ९९.९९ टक्के म्हणजेच जवळपास पूर्ण प्रकाशित असतो. अशी आख्यायिका आहे, की कोजागिरीच्या रात्री कोण कोण जागे आहे? याचा शोध घेण्यासाठी लक्ष्मी आणि कुबेर आकाशात फिरत असतात. यावरूनच या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव मिळाले.

ऋतुनुसार वातवरणात बदल होत असतात. या बदलाला प्रतिसाद देण्यासाठीच सणांची निर्मिती झाली असे म्हटले जाते. त्यामुळे रोजच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून दसरा-दिवाळीप्रमाणेच या कोजागिरीचाही आस्वाद घेण्यासाठी लोकं उत्सुक असतात!हेही वाचा -

यंदा तुम्ही खेळलात का 'सायलेंट गरबा'?

नवरात्रोत्सव विशेष: नवरात्रीत 'या' ९ मंदिरांना नक्की भेट द्या!


संबंधित विषय
ताज्या बातम्या