Advertisement

जाणून घ्या नवरंगांच्या नवलाईमागचं सत्य!


जाणून घ्या नवरंगांच्या नवलाईमागचं सत्य!
SHARES

नवरात्र म्हटलं मुंबईकरांना गरबा-दांडीयाचे वेध लागतात. पण त्याचसोबत मुंबईत मागील काही वर्षांमध्ये 'नवरंगांचा' नवीन ट्रेण्ड सुरू झाला आहे. नवरात्रीत कुठल्या दिवशी कुठला रंग आहे? त्यानुसार कुठल्या रंगाचा ड्रेस वा साडी घालायची असा विचार महिलांच्या डोक्यात घोळू लागतो. नोकरदार महिला असो वा काॅलेज तरूणी किंवा गृहिणी रंगसंगतीचा मेळ साधण्यात सर्वच जणी पुढे असतात. पण त्याचसोबत पुरूषही या नवरंगाच्या नवलाईत सामील होऊ लागले आहेत.    


नवरंग आले कुठून?

परंतु तुमच्या माझ्यापैकी अनेकांना नवरात्रीतील हे नवरंग आले कुठून? त्यांचे दिवस ठरवले कुणी?  असे प्रश्न नक्कीच पडले असतील. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'मुंबई लाइव्ह'ने  या सर्वांचे उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.

भारतीय संस्कृतीत पंचांगाला विशेष महत्त्व आहे. या पंचांगानुसारच ९ दिवसांचे नवरंग ठरतात. पंचांगात प्रत्येक वाराचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या वाराच्या महत्त्वानुसार प्रत्येक वाराचा रंग ठरवण्यात आला आहे. नवरात्र ज्या वारापासून सुरू होते, त्या वारानुसार नवरंगांच्या उधळणीला सुरूवात होते.

जसे की सोमवार हा शंकराचा वार समजला जाते. त्यामुळे सोमवारचा रंग पांढरा.  मंगळवा - गणपती बाप्पाचा वार म्हणून लाल रंग, लाल रंगाचे जास्वंदीचे फूल बाप्पाच्या विशेष आवडीचे. बुधवार बुध देवाचा वार. या दिवशी हिरवा रंग वापरला जातो, गुरुवार दत्ताचा वार म्हणून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. शुक्रवार देवीचा वार म्हणून या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले जातात. तर शनिवार शनी देवाचा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात.

दरवर्षी ज्या वाराला नवरात्र सुरू होते. घट बसतात. त्या दिवसापासून त्या त्या वारचे रंग परिधान केले जातात. या वर्षी गुरूवारी घटस्थापना झाल्याने पिवळ्या रंंगाचे वस्त्र परिधान करण्यात करण्यात आले. केवळ नवरात्रीतच नाही तर इतर दिवशीही वारानुसार रंग परिधान करता येतात.


सर्व रंग वाराप्रमाणे ठरविले जातात. याच रंगाची वस्त्रे नेसलीच पाहिजेत, असे धर्मशास्त्रात सांगितलेले नाही. या रंगाची वस्त्रे नेसल्यास भविष्य चांगले होते असेही नाही. या रंगाची वस्त्रे नेसली नाहीत, तर पाप लागते असेही नाही. परंतु नवरात्रीत सर्व महिलांनी दररोज एकाच रंगाची वस्त्रे नेसली तर समानता दिसून येते. महिलांमध्ये एकजूटपणा दिसून येतो. मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. एकमेकींना मदत करण्याची इच्छा निर्माण होते. शिवाय तसे केल्याने मनाला आनंद वाटतो. मन: स्वास्थ्य टिकण्यास मदत होते. महिलांना उत्साह वाटतो. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव असल्याने हे नवरंग या उत्साहाला हातभारच लावतात.

-  दा. कृ. सोमण,  पंचांगकर्ते खगोल अभ्यासक


मी केवळ नवरात्रीतच नाही, तर दररोज ऑफिसला जाताना वाराप्रमाणे त्या त्या रंगाचे कपडे घालते. त्यामुळे ऑफिसला निघताना दररोज काय कपडे घालायचे हा प्रश्न मला पडत नाही. त्याचप्रामणे नवरात्रीत मी हे रंग केवळ एक ट्रेंड म्हणून फॉलो करते.

- वंदना जोशी


यावर्षीचे ९ रंग पुढीलप्रमाणे :

  1. गुरुवार २१ सप्टेंबर - पिवळा
  2. शुक्रवार २२ सप्टेंबर - हिरवा
  3. शनिवार २३ सप्टेंबर - ग्रे
  4. रविवार २४ सप्टेंबर - केशरी
  5. सोमवार २५ सप्टेंबर - पांढरा
  6. मंगळवार २६ सप्टेंबर - लाल
  7. बुधवार २७ सप्टेंबर - निळा
  8. गुरुवार २८ सप्टेंबर - गुलाबी
  9. शुक्रवार २९ सप्टेंबर - जांभळा



हेही वाचा -

बोरिवलीत 'दांडिया क्वीन'सोबत पाहा 'लाइव्ह गरबा'

नवरात्रोत्सव विशेष: नवरात्रीत 'या' ९ मंदिरांना नक्की भेट द्या!

जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा