Advertisement

पोलीस वसाहतीतील धोकादायक इमारतींची दुरुस्ती


पोलीस वसाहतीतील धोकादायक इमारतींची दुरुस्ती
SHARES

मुंबई - जोगेश्वरी पूर्व येथील म्हाडा वसाहतीतील मेघवाडी पोलीस वसाहतीतील 10 इमारतींमधील 1079 रहिवाशांसाठी खुशखबर आहे. या वसाहतीतील धोकादायक इमारतींच्या दुरूस्तीला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे. धोकादायक इमारतींची दुरूस्ती अनेक वर्षांपासून केवळ निधीअभावी रखडल्यानं मुंबईकरांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचं कुटुंब असुरक्षित होतं. त्यामुळे पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडून 8 कोटींचा निधी मिळावा यासाठी जोगेश्वरीचे आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पुढाकार घेतला आणि त्यात त्यांना नुकतेच यश आलं. पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने 8 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आता या इमारतींच्या दुरूस्तीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती वायकर यांनी दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा