माय मराठीला अभिवादन!

जोगेश्वरी - माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।...27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी राज्यभाषा दिवस. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या काव्य, साहित्यातील अमूल्य कारकिर्दीला उजाळा देण्याचा हा दिवस. जोगेश्वरी पूर्व इथली जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय अस्मिता शाळा गेली 20 वर्ष हा दिवस साजरा करतेय. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही जोगेश्वरी (प.) इथल्या अस्मिता शाळेत 27 फेब्रुवारीला मराठी राज्यभाषा दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मराठीच्या जागराबरोबरच पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांमधील पारितोषिक वितरणानेही मुलांच्या उत्साहात भर पडली. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी होत असताना अस्मिता शाळेनं मात्र 20 वर्षांहून अधिक काळ हा मराठी बाणा जपला आहे. दरवर्षी मराठी भाषा दिनाबरोबरच विविध उपक्रम करणाऱ्या या शाळेबाबत विद्यार्थ्यांनाही अभिमान आहे. त्यांनीही मराठीचा वापर करण्यासाठी सर्वांना आवाहन केले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मुंबई लाइव्ह या न्यूज पोर्टलचे कार्यकारी संपादक स्वप्नील सावरकर यांनी अस्मिता शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, विद्यार्थ्यांशीही संवादही साधला. त्यांच्याच हस्ते अस्मिता विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षिकांतर्फे लिखित 'रुची वाचकांची' आणि 'अविष्कार' या पुस्तकांचा प्रकाशन सोहळाही पार पडला.

Loading Comments