Advertisement

मॉनस्टर बर्गर संपवण्याचं बिग चॅलेंज


मॉनस्टर बर्गर संपवण्याचं बिग चॅलेंज
SHARES

अच्छा मला सांगा एक बर्गर तुम्ही किती वेळात संपवू शकता? माझ्या मते एक बर्गर संपवण्यासाठी १० मिनिटं खूप आहेत. पण खाली फोटोमध्ये दिलेला बर्गर तुम्ही दहा मिनिटांमध्ये संपवू शकता का?



बिग चॅलेंज

या बर्गरची साईज पाहून तर १० मिनिटात हा बर्गर संपवणं कठीणच नाही तर अशक्य आहे. या महाकाय बर्गरचं नाव आहे 'कॉड्रपल बर्गर'. या मॉनस्टर बर्गरला संपवणं हेच एक मोठं चॅलेंज आहे आणि हे तुम्हाला ठराविक वेळेत पूर्ण करायचं आहे. नवी मुंबईतल्या 'फॅट किड डेली' इथं हा कॉड्रपल बर्गर मिळतो.


मॉनस्टर बर्गर

'फॅट किड डेली' तर्फे देण्यात आलेल्या चॅलेंजमध्ये तुम्हाला हा महाकाय बर्गर अवघ्या १० मिनिटांमध्ये संपवायचा आहे. १० मिनिटांच्या आत संपवलात तर तुम्हाला या बर्गरसाठी एकही पैसा मोजण्याची गरज नाही. पण हे चॅलेंज तुम्हाला वाटतंय तितकं सोप्पं मूळीच नाही. कारण बर्गरमध्ये चार प्रकारचे पॅटिज असतात. या साध्या आलू पॅटिज नाहीत तर या आहेत अॅनिमल पॅटिज. चिकन, बीफ, लॅम्ब अशा तीन प्रकारांमध्ये तुम्हाला अॅनिमल पॅटिज मिळतं. या तीन पैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यानंतर चार प्रकारचं चीझ, बाकोन जाम आणि बार्बिक्यू सॉस या सर्वांचा समावेश यात असतो.


या महाकाय बर्गरची किंमत देखील त्याच्यासारखीच आहे. या बर्गरसाठी तुम्हाला १५०० रुपये मोजावे लागतील. महाकाय आणि एवढा हेवी बर्गर खाणं म्हणजे तुमच्या डाएटचा बँड वाजणार. म्हणून जर ही सर्व तयारी असेल तरच हे चॅलेंज स्विकारा.

थोडा हटके

महाकाय बर्गर सोडला तर तुम्ही इतरही काही पदार्थ इथं ट्राय करू शकता. फ्राईज ऑरीओ, डिप फ्राईड रेड वेल्वेट ऑरीओज, मॉनस्टर पिझ्झाज असे हटके पदार्थ देखील इथं उपलब्ध आहेत.


कुठे फॅट किड डेली, युनीट एफ२, पहिला मजला, हावरे पार्क, सेक्टर, ३० ए, वाशी, नवी मुंबई



हेही वाचा

फ्रुट स्टफ कुल्फीची चव लय भारी

हिंमत असेल तर ही थाळी एकट्यानं संपवून दाखवाच




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा