Advertisement

बिर्याणी फेस्टिव्हलची मेजवानी


बिर्याणी फेस्टिव्हलची मेजवानी
SHARES

बिर्यानी म्हणजे खवय्यांचा 'वीक पॉइंट'! मग ती बिर्यानी व्हेज असो वा नॉनव्हेज. बिर्यानीवर ताव मारायला सर्वच तयार असतात. अशाच खवय्यांसाठी ठाण्यात 'बिर्याणी फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलं आहे. आणि९ डिसेंबर म्हणजेच शनिवार आणि रविवार असे दोन दिवस तुम्ही बिर्यानीवर ताव मारू शकता.

खाद्यसंस्कृतीचं वरदान

प्रत्येक राज्याची स्वत:ची एक विशेष अशी खाद्यसंस्कृती असते. त्यातील काही खाद्यप्रकार आता देशभर लोकप्रिय झाले आहेत. त्यापैकीच एक प्रमुख पदार्थ म्हणजे बिर्यानी. मूळ पर्शियातून मुघलांनी आणलेला हा पदार्थ बघता बघता सर्वांच्याच पसंतीस उतरला. नवी दिल्ली, नऊ, हैदराबाद ही ठिकाणं तशी बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहेत. बदलत्या खाद्यसंस्कृतीचं वरदान म्हणा की या वेगवेगळ्या ठिकाणाच्या बिर्याणींचा आस्वाद आता एकाच छताखाली घेता येणार आहे. ठाण्यातल्या उपवन तलाव जवळ या 'बिर्याणी फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलंय.

फेस्टिव्हलची खासियत

फेस्टिव्हलमध्ये चिकन बिर्यानी, मटण बिर्यानी, लखनऊ बिर्यानी, दम बिर्यानी, बांबू बिर्यानी असे बिर्यानीचे बरेच प्रकार चाखायला होते. फक्त बिर्याणीच नाही, तर विविध प्रकारचे स्टार्टर्स आणि कबाबचे अनेक प्रकार देखील फेस्टिव्हलमध्ये आहेत. चिकन कबाब, मटण कबाब, चिकन पॅटिस, फिश कबाब यावर तुम्ही नक्कीच ताव माराल.

मीठा तो बनता है

स्टार्टर आणि मेनकोर्सनंतर मीठा तो बनता है ना बॉस! मग इतकं चटपटीत खाल्ल्यानंतर खवय्यांसाठी स्वीट डिश म्हणून आईस्क्रिम, रम गुलाबजाम, गाजर हलवा, गोड पान, फायर पान अशा गोड पदार्थांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

बिर्याणीसोबत संगीताची मेजवानी

फेस्टिव्हलमध्ये बिर्याणीसोबतच संगीताची देखील मेजवानी आहे बरं का! शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम आहे. लाइव्ह म्युझिक तर फेस्टिव्हलची रंगत आणखीनच वाढवत आहे. मनपसंत खाण्यासोबत सुमधुर गाण्यांची मैफिल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.


कुठे आहे फेस्टिव्हल?

ठाण्यातल्या उपवन तालावाजवळ निलकंठ हाईट्सच्या बाजूच्या मैदानात फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवार आणि रविवार संध्याकाळी ५ ते १० असा फेस्टिव्हल रंगणार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा