Advertisement

'फ्रोझन बॉटल'तर्फे आईस्क्रिमची ट्रिट फक्त ३९ रुपयांत


'फ्रोझन बॉटल'तर्फे आईस्क्रिमची ट्रिट फक्त ३९ रुपयांत
SHARES

आय स्क्रीम, यु स्क्रीम, वुई ऑल स्क्रिम फॉर आईस्क्रिम... आईस्क्रिम खायला कुणाला आवडत नाही? पावसाळा असो वा हिवाळा अथवा उन्हाळा, आईस्क्रिम खायला आपण कधीही रेडी असतो. हाच विचार करून 'फ्रोझन बॉटल'तर्फे आईस्क्रिमचे नवीन फ्लेवर्स लाँच केले आहेत.


आईस्क्रिमची खासियत

फ्रोझन बाॅटल क्रिमी शेक्स आणि केक जारसाठी प्रसिद्ध आहे. पण आता तुम्हाला या आऊटलेटमध्ये आईस्क्रिम्सचाही आस्वाद घेता येणार आहे. त्यांच्याकडे आंबा, चिकू, बेल्झियम चॉकलेट असे फ्लेवर्स आहेत. याशिवाय तुम्ही डाएटवर असाल किंवा तुम्हाला मधुमेह असेल तरी काही टेंशन नाही. कारण यांच्याकडे शुगर फ्री व्हॅनिला आईस्क्रिम देखील उपलब्ध आहे.


स्पेशल ऑफर

फ्रोझन बॉटलतर्फे आईस्क्रिमप्रेमींसाठी एक जबरदस्त ऑफरदेखील देण्यात आली आहे. १३ जुलै ते १५ जुलै असे तीन दिवस तुम्हाला शेक्स आणि आईस्क्रिमवर ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही एक स्कूप आईस्क्रिमचा आस्वाद फक्त ३९ रुपयांत घेऊ शकता.


कधी : १३ ते १५ जुलै

कुठे : शॉप नंबर १३, नॅचरल आईस्क्रिमजवळ, लोखंडवाला कॉम्पलेक्स, अंधेरी (प.), मुंबई

इनऑरबिट मॉल, दुसरा मजला, लिंक रोड, मालाड (प.), मुंबई

वेळ : सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत



हेही वाचा

या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा