राडा खाणार की चिकना चिकनी?


 • राडा खाणार की चिकना चिकनी?
 • राडा खाणार की चिकना चिकनी?
 • राडा खाणार की चिकना चिकनी?
SHARE

'राडा काय मस्त होता राव', 'झिंगाट तर वरपून खाल्ली मी', 'तिथली घेऊन टाक एक नंबर असते'! गडबडलात की काय? पण गटारी असल्यामुळे पुढचे दोन दिवस म्हणजेच 22 जुलै आणि 23 जुलैला ठाण्याच्या पाचपाखाडीमध्ये हे संवाद तुम्हाला ऐकायला आले, तर अजिबात गोंधळून जाऊ नका! कारण हे आहेत खास गटारी स्पेशल मेनू!


अतरंगी फेस्टिव्हल!

ठाण्यात यंदा गटारी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. आता गटारी म्हटलं की वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असणारच! पण हा फेस्टिव्हल काही औरच आहे. आणि याला कारण आहे इथल्या खाद्यपदार्थांची अतरंगी नावं.


गटारी स्पेशल!

ठाण्याच्या 'मी हाय कोळी' या हॉटेलने या गटारी फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. आषाढ महिन्यातली दीप अमावस्याच गटारी अमावस्या म्हणून आपण साजरी करतो. याच गटारीनिमित्ताने 22 जुलै आणि 23 जुलैला गटारी फेस्टिव्हल पार पडणार आहे. या दिवशी संपूर्ण हॉटेलमध्ये दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. शिवाय या दोन दिवसांमध्ये हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना गटारी अमावस्येचं महत्त्व सांगितलं जाईल.


कुठेच बघितलं नसेल असं मेनूकार्ड!

पण यातली सर्वात रंजक आणि भन्नाट गोष्ट म्हणजे या हॉटेलात ठेवण्यात आलेले गटारी स्पेशल मेन्यू आणि त्यांची अतरंगी नावं. असं मेनूकार्ड तुम्ही आख्ख्या मुंबईत कुठे बघितलं नसेल, याची गॅरंटी! नेहमीच्या खाद्यपदार्थांना या दोन दिवसांसाठी स्पेशल नावं देण्यात आली आहेत.


पदार्थ आणि त्यांची अतरंगी नावं

 • सोलकढी पिंट - घेऊन टाक
 • स्टफ्ड क्रॅब - चिकना चिकनी
 • गावरान कोंबडी - झिंगाट
 • चिकन प्लॅटर - राडा
 • चिकन पॉपकॉर्न - चकना आयटम
 • बेबी जिंताडा - अलिबागवरुन आलास का?
 • सी फूड राईस - अतरंगी
 • क्रॅब बास्केट - लाल भडक खेकडा कडक
 • मटण चाप फ्राय - एक नंबर
 • स्टीम्ड सुरमई - लई भारी सुरमई


हॉटेलमध्ये तर आपण नेहमीच जेवायला जातो. तिथले नेहमीचे पदार्थ, त्यांची नेहमीची चव आणि नेहमीचीच नावंही आपल्या सवयीची झाली असतील. पण 'मी हाय कोळी' या हॉटेलने या नेहमीच्या नियमितपणात काहीशी रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही गटारी ठाण्यात स्पेशल जाणार हे नक्की! काय मग? 'लाल भडक खेकडा कडक' घेणार की 'अलिबागवरुन आलास का?'!हेही वाचा

आख्खी मुंबई एकाच हॉटेलमध्ये! बघायचं? मग दादरमध्ये यायचं!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या