Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

आख्खी मुंबई एकाच हॉटेलमध्ये! बघायचं? मग दादरमध्ये यायचं!


SHARES

बेस्ट बसमध्ये पाणीपुरी...पायांखाली रेल्वे स्टेशन्स...डोळ्यांसमोर मुंबईय्या भाषेची ग्राफिटी आणि सोबतीला पोटात भूकेचा गोळा आणणारे खमंग पदार्थ...तुम्ही म्हणाल, की या सगळ्या विसंगत गोष्टी एकाच ठिकाणी कशा? आणि काय करतायत? तर हे एक ओपन सिक्रेट आहे! किंबहुना ती स्पेशालिटी आहे..एका मुंबईकर हॉटेलची...मुंबई बिस्त्रोची!दादरच्या गोखले रोडवर असलेलं हे 'मुंबई बिस्त्रो' हॉटेल. नावाप्रमाणेच हे हॉटेल अजब आहे. आख्ख्या मुंबईची ओळख तुम्हाला या हॉटेलमध्ये गेल्यावर एकाच दमात होऊ शकते. हॉटेलमध्ये गेल्या गेल्या तुमचं स्वागत करते ती मुंबईची बेस्ट बस! चकित झालात ना? त्याहून अजब गोष्ट म्हणजे या बेस्टमध्ये तुम्हाला पानीपुरी सर्व्ह केली जाईल! पानीपुरीचं काऊंटरच इथे बेस्ट बसच्या पद्धतीचं केलं आहे. त्यामुळे इथे अस्सल मुंबईकर चाटचा माहौल तयार होतो.तुम्ही अजून थोडं पुढे गेलात की तुम्हाला दिसतो तो वांद्रे-वरळी सी-लिंक! त्याच्या जोडीला आहे गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल आणि सीएसटीएम रेल्वे स्थानक. हॉटेलच्या आतल्या बाजूला भिंतीवर कोणतीही दुसरी चित्रकला न दाखवता मुंबईची खरी ओळख असलेल्या या वास्तूंची सुंदर ग्राफिटी काढण्यात आली आहे. या सगळ्यांमध्ये खरा मुंबईकर असलेला आणि ज्याला जग मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखतं तो सचिन तेंडुलकरही भेटतो बरं का!हे हॉटेल दोन मजल्यांचं आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी तुम्ही पायऱ्यांकडे गेलात तर तुम्हाला दिसतील ते रेल्वे स्टेशन्स! पण ही खरी स्टेशन्स नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या प्रत्येक पायरीला वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सची नावं दिलेली आहेत. मग त्यात तुम्हाला चर्चगेटपासून थेट बोरिवलीपर्यंत आणि माटुंग्यापासून बांद्र्यापर्यंत स्टेशन्स दिसतील.मुंबईची एक विशिष्ट अशी भाषा आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल. पण ती भाषा कुठेही लिहिलेली सापडत नाही. इथे मात्र तुम्हाला मुंबईची 'लिखित' भाषा सापडेल. मुंबईत अगदी कुठेही आपल्या कानावर पडणारे शब्दसंवाद जसे 'बॉस', 'भाय', 'डूड प्लीज..ठाणे इज नॉट ईन मुंबई!', 'तिकीट छोड ना, टीसी नहीं आएगा', 'स्टक इन ट्रॅफिक..स्टील अॅट अंधेरी', 'एक कटिंग देना' असे एक ना अनेक संवाद तुम्हाला या भिंतींवर दिसतील.इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तरंगती टेबलं! आश्चर्य वाटलं ना? पण घाबरु नका. इथे कोणताही भुताटकीचा प्रकार नसून भिंतीमध्ये फिक्स्ड केलेली टेबलं इथे लावली आहेत. त्यामुळे या टेबलांना पायच नाहीत असंच म्हणा!आता पाळी आहे ती मेन्यूकार्डची. हॉटेल संस्कृती आणि अर्निंग पॉवर या गोष्टींचा विचार करता, इथले पदार्थही अगदी तरुण आहेत! आणि तेही परवडणाऱ्या दरात! पिझ्झा, बर्गर, शोरमा, नोकटेल, पास्ता असे एक ना अनेक पदार्थ तुम्हाला मेन्यूकार्डमध्ये दिसतील. समजा तुम्ही ऑर्डर दिली आणि ती यायला वेळ लागतोय आणि तेवढ्या वेळात करायचं काय असा प्रश्न तुम्हाला पडलाय? वरी नॉट! तुमचं मनोरंजन करण्याची पुरेपूर व्यवस्था इथे केलेली आहे. कार्ड, सापशिडी, सुडोकूसारखे वेगवेगळे गेम्स तुम्ही खेळू शकता.मूळचा आयटी पार्श्वभूमी असलेल्या सिद्धेश घनकुटकर आणि त्याचा लहान भाऊ रुत्वेश या दोघांनी मिळून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.


मला प्रेझेंटेशन आवडतं. त्यामुळे इथे प्रत्येक गोष्टीत मी एक्स फॅक्टर अॅड करायचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या प्रकारचे सहा मॉकटेल मी इथे देतो. खरंतर मी आयटी बॅकग्राऊंडचा आहे. पण फुडी असल्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं होतं. लहान भावाने ही कल्पना सुचवली आणि आम्ही मिळून ती उभी केली.

- सिद्धेश घनकुटकर, मालक, मुंबई बिस्ट्रो


मी अनेक देशांमध्ये फिरलो. तिथल्या हॉटेल्ससारखं अॅटमॉस्फिअर मला मुंबईत हवं होतं. पण ते कुठेच मिळालं नाही. त्यामुळे इथल्या मध्यमवर्गी मुंबईकरांसाठी मला रिजनेबल रेट्समध्ये तसं अॅटमॉस्फिअर उभं करायचं होतं.

- रुतवेश घनकुटकर, हॉटेल मालक

या दोघा भावांनी मिळून आख्खी मुंबईत एका ठिकाणी आणली की हो! त्यामुळे आता मुंबई दर्शन करायचं असेल, तर आख्खी मुंबई फिरायची गरजच नाही. पायात चपला घाला आणि थेट दादरमधलं मुंबई बिस्ट्रो गाठा!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा