Advertisement

होळी निमित्त Googleची मजेदार ट्रिक

आता तुमच्या मोबाईलची स्क्रिनही होणार 'कलरफुल'... ट्रिक ट्राय करायची आहे मग वाचा...

होळी निमित्त Googleची मजेदार ट्रिक
SHARES

आज देशभरात होळीनिमित्त सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. Google नं सुद्धा यूजर्जना होळीचं एक छान सरप्राइज दिलं आहे. तुम्ही Holi हा शब्द दिवसभरात Search केलात का? नसेल तर आत्ता करून पाहा. होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गुगलने एक ट्रिक आणली आहे. ही पद्धत फार आकर्षक आणि गुगल युजर्सना भुरळ पाडणारी आहे.


काय आहे ट्रिक?

गुगलवर जेव्हा आपण कुठलाही शब्द माहिती मिळवण्यासठी टाइप करतो तिथे फक्त ‘Holi’ हा शब्द टाइप करायचा आणि सर्च करायचा. हा शब्द टाइप केल्यानंतर युजर्सना रंगांनी भरलेलं एक पॅलेट त्यांच्या स्क्रिनवर दिसेल. त्यावर आपण पुढे जसं जसं क्लिक करत जाऊ तसतसं स्क्रिनवर आणखी रंग वाढत जातील. आणि काही वेळानंतर संपूर्ण स्क्रीनवरच रंगांची उधळण झालेली दिसेल.


कुठल्या गुगल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध?

गुगलनं अँड्रॉइड मोबाईल युजर्स, गुगल फोन्स, मोबाईल वेबवरसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच Apple युजर्सना सुद्धा मोबाईलवर होळी साजरा करता येणार आहे.



रंग नको असल्यास...

दरम्यान हे रंग जर कुणाला स्क्रिनवर नको असतील तर त्यासाठीसुद्धा गुगलने सुविधा केलेली आहे. आपल्या मोबईल स्क्रीनवर गुगलनं एका पाण्याच्या थेंबाचं चिन्ह दिलेलं आहे. त्यावर टच करताच आपली स्क्रीन पाण्यानं धुतल्याप्रमाणे स्वच्छ होऊन जाईल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा